इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – इगतपुरी येथील एका आदिवासी परिवारातील मुलीचे लग्न आज दुपारी सव्वा तीन वाजता पार पडणार होते. त्यासाठी महिनाभरापासून पत्रिका वाटप, विविध कपडे आणि साहित्याची खरेदी, मानपान, चालीरीती, रुसवे फुगवे असे सगळे कार्यक्रम पार पडले. आज ह्या विवाह सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वऱ्हाडी मंडळ मोठ्या उत्साहात हजर झाले. लग्न लागण्याचा वेळ होताच चक्क नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाल्याचे लक्षात आले. यामुळे नवरदेव, वऱ्हाडी मंडळ आणि उपस्थित लोकांचा चांगलाच हिरमोड झाला. यानंतर हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांनी इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या साहाय्याने नवरी मुलगी आणि तिचा प्रियकर सापडले. यावेळी मुलीच्या वडिलांनी नवरदेव आणि नवरी यांच्याकडे झालेल्या ३ लाखांच्या खर्चाची मागणी मुलीच्या प्रियकराकडे केली. मात्र प्रियकर मुलाने चक्क हात वर करून पैसे देण्यास नकारघंटा वाजवली. नवऱ्या मुलीला तुमच्या ताब्यात घ्या, मला नको ती… असे म्हणत प्रियकर बाजूला झाल्याने सर्वजण हतबल झाले. झालेला सगळा तमाशा पाहून वैतागलेल्या नवरीच्या परिवाराने आपलं आपलं घर गाठलं.. मात्र पुढील तासाभरात दिवटी नवरी त्याच दिवट्या प्रियकरासोबत पुन्हा पळून गेली. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात कृतघ्न नवरीच्या कृत्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group