प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – कल्पतरू फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्यातुन व बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाने पाडळी देशमुख ग्रामपंचायतीच्या गायराणात १४ लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. सर्वांनाच मार्गदर्शक ठरणाऱ्या या कामामुळे सर्वत्र कौतुक होत असुन यामुळे शेकडो एकर कोरडवाहु क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. गायरानात फळबाग लागवडीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाडळी देशमुख ग्रामपंचायतीने नवा आलेख उभा केला आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर पाडळी देशमुख येथे पार पडले. यावेळी शेतकऱ्यांसाठी आवश्यक योजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. यात फळबाग लागवड, शेततळे, शेतीसाठी जोडधंदा, दुग्ध व्यवसाय यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराची सांगता झाल्यानंतर पाडळी देशमुख गायरानातील जागेत १४ लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कंपन्या व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना मोठा हातभार लागत असल्याने गावकऱ्यांनी ऋण व्यक्त केले.
कल्पतरू फाउंडेशन व बायफ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरासह १४ लाख लिटर क्षमतेचे शेततळे होतेय. ही आमच्यासाठी महत्वाची बाब असुन यापुढेही अशा विकासकामांसाठी ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांसह आपण प्रयत्नशील राहु.
- बाळासाहेब आमले, उपसरपंच पाडळी देशमुख
कार्यक्रमाप्रसंगी बायफचे व्यवस्थापक सुरेश सहाणे, अतिरिक्त कार्यक्रम समन्वयक मुकुंद बाविस्कर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता संदिप पवार, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सभापती कचरु पाटील शिंदे, रामदास धांडे, माजी सरपंच जयराम धांडे, चेअरमन विष्णु धोंगडे, विजय जाधव, ठकाजी धांडे, रामकृष्ण धोंगडे, रामभाऊ धांडे, तुकाराम वारघडे, ग्रामपंचायत सदस्य किरण धांडे, रामदास धोंगडे, प्रल्हाद धांडे, ग्रामसेवक संदिप निरभवणे, फकिरराव धांडे, दिनेश धोंगडे, रमेश धांडे, मधुकर धांडे, संजय धोंगडे, उत्तम फोकणे, अनिल धांडे, रामदास धांडे, भगवान धांडे, रतन धांडे, बाळासाहेब धांडे, मोहन आमले, रवींद्र घाटेसाव, सोमनाथ चारस्कर, प्रतिक धांडे, पंडित धांडे, संदिप धांडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.