पिंपळगाव मोर येथे भरदिवसा धाडसी घरफोडी ; ८ लाखांचा ऐवज लुटण्यात चोरटे यशस्वी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील पिंपळगाव मोर येथे आज भर दुपारच्या सुमारास धाडसी घरफोडी करण्यात आली आहे. ह्या घटनेमध्ये जवळपास ७ ते ८ लाख रुपये किमतीचा ऐवज लुटण्यात आल्याचे समजते. ह्यामध्ये टोमॅटो विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि जुने मौल्यवान सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लुटले असल्याचे वृत्त आहे. ही घटना पिंपळगाव मोर येथील सुरेश संतू काळे यांच्या महामार्गाच्या लगत  असलेल्या बंगल्यावर घरी कोणीही नसल्याचे पाहून घडली. घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिसांनी तपासकार्य सुरु केले आहे. डॉगस्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ बोलावून तपास सुरु झाला आहे. यासह प्रस्तुत प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासात विशेष लक्ष घालून अज्ञात चोरट्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Similar Posts

error: Content is protected !!