कवितांचा मळा – मान मराठीचा

कवयित्री – सौ. माधुरी पाटील – शेवाळे

चला करूया साजरा
दिन मराठी भाषेचा
आहे मान मराठीला
अभिमान गौरवाचा…

रोज बोलूया मराठी
स्थान हृदयी जपुया
करू लेखन आपण
बोल मराठी बोलूया…

जन्म कुसुमाग्रजांचा
दिन मराठी गौरव
करी जगात साजरा
माझा मराठी मानव…

मान देऊ मराठीला
करू पूजन मातीचे
देई सुगंध साऱ्यासं
बोल माझ्या मराठीचे…

जपा संस्कृती आपूली
बोला तुम्ही मराठीत
आहे तीच राजभाषा
ठेऊ तिला स्मरणात…

अभिमान बाळगावा
माय मराठी भाषेचा
मुखी गावावा गोडवा
इतिहास शिवाजीचा…

संत थोर ज्ञानदेव
जगा दिली ज्ञानेश्वरी
रेडा मुखी वेद बोली
मुळी मराठीच भारी…

गोड रसाळ मधुर
माझी मराठीची वाणी
वाटे अवीट अवीट
गाऊ तिची रोज गाणी…

गंध माझ्या मराठीचा
लावू कपाळी रोजच
करू जतन तिलाच
आज वाजत गाजत…

Similar Posts

error: Content is protected !!