इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – बोरटेंभे येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेचा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला. सर्व मान्यवर, देणगीदार, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी पदाधिकारी या सर्वांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी देशभक्ती, भारताची संस्कृती, लोकजीवन व सामाजिक प्रबोधनाची झलक दाखविली. पाहुण्यांनी विद्यार्थी गुणवत्ता, कलागुणांचे कौतुक करून विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंडे यांनी गाव एकत्र आल्याने शाळेचा विकास होतो हे बोरटेंभेने दाखवून दिल्याचे कौतुक केले. गावकऱ्यांनी एम्पथी फाउंडेशनचे आभार मानले. सूत्रसंचालन माणिक भालेराव, प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले.
यावेळी एसएमसी अध्यक्ष सोनु आडोळे, उपाध्यक्ष गुरुनाथ आतकरी, सदस्य भानुदास आडोळे, नितीन आडोळे, सिद्धेश्वर गवळी, रमेश आडोळे, रवी आडोळे, तुळशीराम आरशेंडे, उत्तम भडांगे, रुख्मिणी आडोळे,.ग्रामस्थ देविदास आडोळे, रविंद्र आडोळे, सोमनाथ नवले, विलास आडोळे, लक्ष्मण नवले, महेंद्र दुभाषे, सोमनाथ आतकरी, आरती आडोळे, अंकुश आडोळे, सुनीता भडांगे, शिवाजी आरशेंडे, जालिंदर आडोळे प्रवीण भोर, शिक्षक वृंद, विविध शिक्षक संघटना पदाधिकारी, विविध मुख्याध्यापक, आजी माजी विद्यार्थी, पालक, युवक मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
भानुदास नवले, ग्रामपंचायत बोरटेंभे, शालिनी तुरेकर व संजय तुरेकर, बाबूलाल आडोळे, रामदास आडोळे, गुरुद्वारा इगतपुरी, आनंद मंगल हॉटेल, शर्मा साहेब पेट्रोल पंप, दिपक आडोळे, भागवत आडोळे या सर्वांनी शाळेला विविध साहित्य आणि बक्षिसे दिली. टिटोलीचे उपसरपंच अनिल भोपे, निवृत्ती तळपाडे यांनीही विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. दिपाली आडोळे, दामिनी नवले, प्रगती आडोळे, चंदना आडोळे, युवराज आडोळे, कुणाल आडोळे, शंकर आडोळे, दिव्या, शीतल, गौरी, पूनम, काजल, साक्षी, प्रमिला, साधना, उर्मिला आदी गुणवंतांना मान्यवरांनी सन्मानित केले. विजय पगारे, गिरणारेचे मुख्याध्यापक अनिल जाधव, जनार्दन करवंदे, सौरभ अहिरराव, रावसाहेब दुनबळे, अवधूत खाडगीर, गोरख खैरनार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर घोडे, दशरथ सोनवणे यांनी तांत्रिक सहाय्य, अलका भारंबे, अनिता बुवा, प्राजक्ता महाजन, कल्पना आरशेंडे, इंदिरा नवले यांनी मान्यवरांचे स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आभार जनार्दन कडवे यांनी मानले.