
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – शून्यातून उभे केलेल्या विश्वातून आतापर्यंत समाजासाठी अभूतपूर्व काम केले आहे. रोटरी क्लब ऑफ हिल सिटी या संस्थेचे अध्यक्षपद हे जबाबदारीचे पद आहे. देशात उल्लेखनीय कामगिरी करतांना माझ्या संस्थेचे नाव संदर्भ म्हणून घेतले जाईल. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कामांचा धडाका सर्वांना पाहायला मिळेल. यानिमित्ताने प्रत्येक माणसाच्या हृदयात राहणाऱ्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कटीबद्ध आहे असा शब्द रोटरी क्लब ऑफ हिल सिटी या संस्थेचे नूतन अध्यक्ष गोरख बोडके यांनी बोलतांना दिला. आज गोरख बोडके यांचा अध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शपथ देऊन शुभेच्छा दिल्या. रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कामांचा आढावा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ सेवन नाईन हिल्सचे अध्यक्ष तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. राजन पिल्लई, नानाभाऊ शेवाळे यांनी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दादासाहेब देशमुख, राहुल देशमुख, त्रिलोचन देशपांडे, वैभव चावक, विजय जोशी, हेमंत खोंड, कमलेश पोखरणा, संदीप बनभेरू, हरीश चव्हाण, संजय खातळे, अनिल भोपे, विनायक पाटील, विनायक गतीर, भगीरथ भगत, पांडुरंग खातळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विराज गडकरी यांनी केले. गोरख बोडके यांचे पदग्रहण कार्यक्रमानिमित्त इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, शहापूर, अकोले आणि नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्हाभरात गोरख बोडके यांनी विविधांगी विकासाची कामगिरी केलेली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरही ते अव्वल कामगिरी करणारे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणूनही ते ओळखले जातात. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी अभूतपूर्व काम केलेले आहे. कोरोना काळातील जीवनरक्षक असणाऱ्या टॉप टेन कामातही श्री. बोडके अग्रेसर आहेत. जागतिक दर्जाच्या रोटरी ह्या संस्थेच्या माध्यमातून आता गोरख बोडके यांचे कार्यही आता “ग्लोबल ॲचिव्हमेंट” ठरणार आहे.