शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण लोहरे, व्हॉइस चेअरमनपदी संतोष शिरसाठ बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुका शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण लोहरे आणि व्हॉइस चेअरमनपदी संतोष शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली आहे. इगतपुरी तालुका शिक्षक सोसायटीची चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया इगतपुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली. चेअरमन पदासाठी नारायण लोहरे व व्हॉइस चेअरमन पदासाठी संतोष शिरसाठ यांचा एक एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे, पांडुरंग सराई यांच्या हस्ते चेअरमन, व्हॉइस चेअरमन आणि नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

सर्व संचालकांनी पतसंस्थेच्या विकासासाठी हातभार लावावा असे मनोगत महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने निवृती तळपाडे यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक गोरख तारडे, जनार्दन करवंदे, देविदास हिंदोळे, तुकाराम सारुक्ते, नामदेव साबळे, दत्तू साबळे, सुगंधा कोरडे, शीला गातवे, मंजुषा सानप आदी उपस्थित होते. आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, एनडीपीटीचे व्हॉइस चेअरमन ज्ञानेश्वर भोईर, काशीनाथ भोईर, शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष एनडीपीटीचे संचालक दिलीप धांडे, उत्तम भवारी. राजू शेळके, ज्येष्ठ नेते भगवंत झोले, तालुका नेते कैलास भवारी, तालुकाध्यक्ष भावराव बांगर, शिक्षक भारती तालुकाध्यक्ष लक्ष्मण खातळे, तालुका सरचिटणीस एनडीपीटीचे संचालक मारुती कुंदे, तालुका नेते संपत धांडे, कोषाध्यक्ष राजाराम इदे, मधुकर रोगटे आदींच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली.

Similar Posts

error: Content is protected !!