इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – गेल्या दोन पिढ्यांपासुन वादात रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. शिवसेनेचे भाऊसाहेब धोंगडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आज ह्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. रस्त्याचा जुना वाद सोडवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले. लोकनियुक्त सरपंच संगीता धोंगडे यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात रखडलेली मोठी कामे पूर्ण होऊ शकतात असा विश्वास प्रमुख मार्गदर्शक गंगाराम अप्पा धोंगडे यांनी व्यक्त केला.
आगामी काळात या प्रकारचे सहकार्य गावातील शेतकऱ्यांनी केल्यास गावातील शेती रस्ते पूर्ण करता येतील असे विश्वास माजी सरपंच अशोक धोंगडे यांनी व्यक्त केला. रस्त्याचा महत्वाचा प्रश्न आणि कामाची सुरुवात झाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक तानाजी धोंगडे, काशिनाथ धोंगडे यांनी केला. याप्रसंगी राजकीय मार्गदर्शक गंगाराम अप्पा धोंगडे, माजी सरपंच अशोक धोंगडे, जेष्ठ नागरिक रोहिदास धोंगडे, माजी सरपंच राजाराम धोंगडे, परशुराम सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब धोंगडे, माजी उपसरपंच बाळू शिवराम धोंगडे, ग्रामपंचायत सदस्त जितू पवार, शिवसेना कुन्हेगाव प्रमुख विष्णू धोंगडे, प्रगतीशील शेतकरी बाबू धोंगडे, रोहीदास धोंगडे, गोटीराम धोंगडे, रमेश मुसळे आदी शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.