
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहिसर येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे ४ दिवसीय शिबीर संपन्न झाले. या शिबीर कालावधीत धामडकीवाडीचा रस्ता दुरुस्ती, शाळेला किचन शेड, शालेय आवारात व वाडीत सोलर स्ट्रीट काम पूर्ण करण्यात आले. सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलमार्फत ६ वर्षांपासून भगतवाडी आणि धामडकीवाडी भागात शिबीर राबवत असते. यानिमित्ताने शाळा आणि गावासाठी मदतीचे काम करत आहेत. या कामासाठी ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर मुंबईची मोलाची साथ मिळाली. 4 दिवसीय शिबिरामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना भरपेट खाऊ आणि विविध शैक्षणिक मदत देण्यात आली. शिबिराच्या समारोपाप्रसंगी धामडकीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, बबन आगिवले, गोविंद आगिवले, खेमचंद आगिवले आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.