वाडीवऱ्हे पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी अनोळखी मयत युवकांच्या नातेवाईकांचा लागला शोध : “इगतपुरीनामा”च्या बातमीची झाली मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8

वाडीवऱ्हे पोलीसांचा सततचा पाठपुरावा आणि “इगतपुरीनामा न्यूज पोर्टल”वर प्रसिद्ध झालेली बातमी यामुळे मयत अनोळखी व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. अवघ्या काही तासात अनोळखी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे मयताची ओळख पटली आहे. नातेवाईकांचा तातडीने तपास लागल्याने पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी पोलीस हवालदार प्रवीण मोरे, लहू भावनाथ, प्रवीण काकड, पवार, निंबाळकर यांचे विशेष कौतुक केले आहे. इगतपुरीनामा न्यूज पोर्टलला सुद्धा धन्यवाद देण्यात आले आहेत.

मयताचे नाव आतिश संजय डंबरे वय 22 राहणार कोल्हेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर असे निष्पन्न झाले आहे. आज मयताचे वडील संजय मच्छिंद्र डांबरे यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. अकस्मात मृत्यूच्या तपासात पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण मोरे, लहू भावनाथ, प्रवीण काकड, पवार, निंबाळकर यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. मयताच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!