आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने नाशिक तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान : विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवळ आदी मान्यवरांच्या हस्ते सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30

आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने नाशिक तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य, सरपंच यांचा सन्मानसोहळा उत्साहात पार पडला. जातेगाव, ओझरखेड, धोंडेगाव, राजूर-बहुला, राजेवाडी, नाईकवाडी, नागलवाडी, गंगावऱ्हे, सावरगाव, दहेगाव, सारूळ, इंदिरानगर, वाडगाव, वासाळी, दुगाव, गणेशगाव, गोवर्धन या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांना सन्मानित करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या नाशिक तालुकाध्यक्षपदी अशोक गोतरणे, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अंकुश बेंडकुळे, नाशिक महिला शहराध्यक्षपदी रोहिणी सुभाष धुळे, त्र्यंबक तालुका उपाध्यक्षपदी राजू जाधव, उलगुलान कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सिद्धेश्वर अंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना ना. झिरवाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी ना. नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना आपल्या भाषणातून ग्रामपंचायत, सरपंच यांचे अधिकार, कार्य, पेसा कायदा याबाबत सविस्तरपणे मौलिक मार्गदर्शन केले. संघटनेचे संस्थापक कैलास शार्दुल यांनी आपण निवडून आलो निकाल लागला त्या दिवसापासून राजकीय मतभेद विसरून विरोधकालाही सोबत घेऊन जनतेची कामे विश्वासाने मार्गी लावावी, जनतेत विश्वास निर्माण करून लोकोपयोगी विकासात्मक कामे मार्गी लावावी असे आवाहन केले.

संघटनेच्या वतीने प्रास्ताविक व संघटनेच्या कामाचा आढावा प्रवक्ते देवा वाटाणे यांनी मांडला. कार्यक्रमप्रसंगी ना. नरहरी झिरवाळ, संघटनेचे संस्थापक कैलास शार्दुल, एचके कन्स्ट्रकशनचे संचालक वामन खोसकर, जिल्हाप्रमुख दिलीप गांगुर्डे, महिला जिल्हाप्रमुख मीराताई डोळस, नाशिक तालुकाध्य्क्ष अशोक गोतरणे, त्र्यंबक तालुकाध्यक्ष अशोक लहांगे, ग्लोबल ट्रायबल एज्युकेशन सोशल ट्रस्टचे अध्यक्ष दिपक गांगुर्डे, उलगुलान कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शांताराम चारोस्कर, प्रदेश सरचिटणीस अरुण पवार, मित्रमेळा संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण गायकवाड,  सामाजिक कार्यकर्ते दिनकरराव लिलके, उत्तमराव ठमके, कैलास बेंडकुळे, सरपंच परिषदेचे गायकर, माजी समाजकल्याण सभापती दिलीप थेटे, मार्गदर्शक दिनकर पांडे, जेष्ठ नेते विष्णुपंत म्हैसधुणे, जिप सदस्य अशोक टोंगारे, सामाजिक नेते पी. के. जाधव, विजयराव वाघले आदी प्रमुख मान्यवर आणि नाशिक तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, लोकनियुक्त सरपंच यांच्यासह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोअर कमिटी सदस्य सुनील कोकणे, नाशिक शहराध्यक्ष शशिकांत मोरे, नाशिक तालुकाध्यक्ष अशोक गोतरणे, जिल्हा कोषाध्यक्ष महेश पवार, शहर सरचिटणीस विशाल पोटींदे, शहर संघटक वाल्मिक निसाळ, शहर कोषाध्यक्ष नितीन तांदळे, शहर उपाध्यक्ष कैलास आचारी, बालाजी बेंडकुळे, पूर्व विधानसभा अध्यक्ष महेश शेलार, वाळू गुंबाडे, भीमा वनसे, गोकुळ थेटे, रोशन चारोस्कर, महेश आव्हाड, गभाले दादा, विठ्ठल बेंडकुळे, योगेश शिंगाडे आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभार देवा वाटाणे यांनी व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!