रचना : रत्ना खाडे- मेमाणे, जि. प. शाळा त्रिंगलवाडी
गुरु करिती विद्येचे दान
दुर करि अंधार,अज्ञान,
ज्ञान देण्याचे काम करूनी
शिष्यांना करतात सज्ञान.।१।
आई वडील पहीले गुरु
दिली जग पाहण्याची दृष्टी,
वंदन करून त्यांना स्मरु
दाखविली ही सुंदर सृष्टी.।२।
चढता शाळेची ती पायरी
पाटी,पेन्सिल शिष्याच्या हाती,
कोऱ्या मनावं रंग भरती
त्यांची शिक्षक म्हणून ख्याती.।३।
सावित्रीबाई ज्योतिबा फुले
केला अन्याय फार सहन,
या जगाचा करण्या उद्धार
गुरु झाले ते थोर,महान.।४।
झाले शिक्षक ,राष्ट्रपती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,
जन्मदिनाच्या स्मृती स्मरून
शिक्षकांचा करिती सन्मान.।५।
येता गोड विद्यार्थी शाळेत
गजबजून जाते ही शाळा,
सुख दुख सांगे मनातले
शिक्षक लावती त्यांस लळा.।६।
अक्षर,अक्षर ते शिकवी
शब्द शब्द ते समजावती,
गणित, विज्ञान,इतिहास
संकल्पना त्या उमजावती.।७।
शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते
शिक्षक राष्ट्राचा आहे कणा,
गरूड झेप घेण्यास बळ
संस्कार देती विद्यार्थि मना.।८।
शिष्य यशाची भरारी घेता
देई समाज शिष्यास मान,
गुरूजन होती आनंदीत
विद्यार्थ्यांच्या ह्रदयात स्थान.।९।