प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले इगतपुरी तालुक्याचे नवनिर्वाचित संचालक ॲड. संदीप गुळवे यांचे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी आणि पाडळी फाट्यावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलकडून इगतपुरी तालुक्याचे ॲड. संदीप गुळवे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, गोंदे, पाडळी फाट्यासह इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
माजी सरपंच जयराम धांडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन नवनिर्वाचित संचालक ॲड. संदीप गुळवे यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, जेष्ठ नेते रामदास बाबा मालुंजकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, माजी सरपंच पोपटराव धांडे, कारभारी नाठे, ज्ञानेश्वर धोंगडे, बजरंग वारुंगसे, निलेश चोरडिया, दिनेश धोंगडे, आकाश दिवटे, लकी गोवर्धने, जयराम गव्हाणे, प्रतीक गोवर्धने, रतन धांडे, सोमनाथ चारस्कर, निवृत्ती आंबेकर, ज्ञानेश्वर बोराडे, लक्ष्मण धोंगडे, महेश धांडे, रघुनाथ वारुंगसे, संजय धांडे आदींसह कार्यकर्ते आणि गुळवे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.