प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
पाडळी देशमुख येथे शालेय विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांनी उत्साहाने स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच खंडेराव धांडे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामदास धांडे यांनी सरपंच, उपसरपंच तसेच कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकिरराव धांडे यांच्या कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल स्तुती केली.
उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी गावाच्या विकासाबद्द्ल माहिती देत मागील सर्व सरपंचाचे आभार मानले. पाडळी देशमुख येथील जेष्ठ नागरिक रुंजाजी आबाजी धांडे यांनी सामाजिक दायित्वच्या भावनेने शालेय विद्यार्थ्यांना गरजेचे असणारे संगणक संच त्यांच्या पत्नी कै.जाईबाई रुंजाजी धांडे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेला भेट दिला याबद्दल शालेय विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद व नागरिकांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी माजी सरपंच पोपटराव धांडे, बजरंग वारुंगसे, जयराम धांडे, सोसायटी चेअरमन विष्णू धोंगडे, रामभाऊ धांडे, गरगे गुरुजी, रामभाऊ धोंगडे, दिनेश धोंगडे, रतन धांडे, प्रल्हाद धांडे, किरण धांडे, भगवान धांडे, सुभाष फोकणे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.