राजमुद्रा मित्रमंडळाच्या वतीने यशस्वी मान्यवर आणि विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

गोंदे दुमाला येथील राजमुद्रा मंडळाच्या वतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्व आणि यशवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. समाज आणि गावाची सेवा करून आपला आदर्श निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. त्यानुसार मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, राजमुद्रा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप नाठे, अध्यक्ष समाधान वारुंगसे, कार्याध्यक्ष बंडू नाठे आणि राजमुद्रा मंडळाच्या वतीने 2022 वर्षासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, नगरसेवक योगेश शेवरे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, मनसे नेते मुलचंद भगत, तालुकाध्यक्ष शत्रुघ्न भागडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पत्रकार भास्कर सोनवणे, मनसे नेते गणेश मोरे, गोंदे सरपंच शरद सोनवणे, माजी चेअरमन विजय नाठे, शिवराम बेंडकोळी, सजन नाठे, डॉ. रुपेश नाठे, महादू नाठे, सागर नाठे ह्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा झाला.

यशस्वी विद्यार्थी ज्योती भास्कर सोनवणे, कांचन दिलीप शेलार, रोहिणी मोहन जाधव, समीक्षा गणेश नाठे, राधिका संपत बंदावणे, सिद्धेश जयराम नाठे, मनोज कांतीलाल जाखेरी, लक्ष्मी बाळू पवार, धीरज शिवशंकर पासवान, साक्षी रामदास राव, अक्षदा गणेश धोंगडे, गायत्री शंकर पासवान, जागृती योगेश नाठे, श्रावणी संदीप नाठे, नीलम सुनील नाठे,सपना राजाराम डगळे, ओमकार दिनकर भोर, रोहन संजय धोंगडे, भाग्यश्री रवींद्र उपासे, श्रुती हिरामण नाठे, अर्जुन ज्ञानेश्वर उगले, कोमल मनोहर शिंदे, अंकुश भारत नाठे, विजय आबा जाधव, प्रीती जगन्नाथ नाठे, सुशांत चंद्रभान नाठे, पायल रोहिदास नाठे, राणी लक्ष्मण राव, माधुरी दिनकर भोर, आरती डोंगळे, तृप्ती बाळू नाठे, साक्षी शिवाजी गायकवाड, रवीना रोहिदास नाठे, अंकिता भाऊसाहेब नाठे, माधुरी परमेश्वर नाठे, कादंबरी यादव नाठे, रवीना एकनाथ बोराडे, वैशाली संजय भोर, माया हिरामण कातोरे, प्रिया बाळू चव्हाण, संजीवनी संपत धोंगडे, दिपाली कैलास राव, प्रतीक्षा कैलास राव, धनश्री रंजन बोराडे, साक्षी लक्ष्मण शिंदे, आकांक्षा सोमनाथ मांडे, रोहिणी साहेबराव गाडेकर यांनी अव्वल यश संपादन केल्याबद्धल त्यांना सन्मानित करण्यात आले.

Advt

गावात विविध क्षेत्रातील ॲड. मधुकर यशवंत नाठे, गजीराम मल्हारी नाठे, सुभाष सोनवणे, योगेश राजाराम आहेर, डॉ. प्रीती पाटील, आरोग्य सेवक राजाराम भोईर, आशा वर्कर जयश्री दत्तू आहेर, रत्ना धोंगडे, भारती जाधव, आदर्श शिक्षक निवृत्ती यशवंत नाठे, सिद्धिविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक तुषार पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मधुसूदन अहिरे, डॉ. पंकज चंद्रभान नाठे, डॉ. वृषाली हरिश्चंद्र नाठे, डॉ. प्रियंका कैलास नाठे, ॲड. अश्विनी मधुकर नाठे, वीज कर्मचारी सागर राव, सॅमसोनाईट कंपनी, नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, गोंदे ग्रामपंचायतीचे सर्व महिला कर्मचारी यांना विशेष कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. राजमुद्रा मित्र मंडळाचे मच्छिंद्र काळे, ऋषिकेश नाठे, राहुल नाठे, लखन नाठे, अजय नाठे, प्रकाश नाठे, रामेश्वर चाटे, अजय गुप्ता आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गणेश नाठे यांनी केले.

Advt

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!