सुसंस्कारांची पेरणी करणाऱ्या ८० बाल वारकऱ्यांना वारकरी वेशभूषा साहित्याचे वाटप : तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

वारकरी परंपरेची कास धरून सन्मार्ग आणि संतांच्या विचारांची सांगड घालण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील बाल वारकऱ्यांचे कार्य सुरु आहे. भजन, कीर्तन, वादन, हरिपाठ, पारायण, वाचन आदी मार्गांनी परमेश्वराची सेवा हे बाल वारकरी करीत असतात. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये सुसंस्कारांचे बीज पेरले जाते. ह्या बाल वारकऱ्यांना इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते वारकरी पद्धतीचे धोतर आणि शर्टसाठी कपडे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. इगतपुरी तहसीलदार कार्यालयात आज हा छोटेखाणी कार्यक्रम झाला. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी नांदगाव सदो येथील बाल वारकऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. एखाद्या वारकरी कार्यक्रमात मला वारकरी म्हणून बोलवा असा प्रेमळ आग्रह श्री. कासुळे यांनी यावेळी केला.

तब्बल ८० बाल वारकऱ्यांना हे साहित्य वाटण्यात येणार असून प्रतिनिधिक स्वरूपात ह्या कार्यक्रमामध्ये ६ बाल वारकऱ्यांना वाटप झाले. सिन्नर येथील हरदास गुरुजी परिवार, साकुर येथील सई कलेक्शनचे संचालक अशोक सहाणे, माणिकखांबचे माजी सरपंच हरीश चव्हाण, शिक्षक नेते निवृत्ती नाठे यांच्या साहाय्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भगत, सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, पत्रकार वाल्मिक गवांदे, लक्ष्मण सोनवणे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!