इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार – २०२२’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत, डिजिटल होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते इयत्ता सातवी), B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (इयत्ता आठवी ते पदवीधर)
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षकांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम अहवाल लेखनाबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी शिक्षकांनी www.shikshakdhyey.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टायपिंग करून तयार करावा. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. A आणि B गटातील प्रत्येकी प्रथम दहा उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र + शिक्षक ध्येय प्रिंट मासिके कुरिअरने घरपोच पाठविण्यात येईल. ( एकूण 20 पारितोषिके देण्यात येतील ) तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 51 डिजिटल अंक व्हाट्सॲप नंबरवर पाठविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी ‘शिक्षक दिनी’ जाहीर करण्यात येईल. उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 वर संपर्क करावा. राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’च्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.