प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी इगतपुरी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांची जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी नियुक्ती केली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते श्री. धांडे यांना जिल्हा सरचिटणीस ह्या पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडोळे, ज्ञानेश्वर काळे आदी जिल्हा पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. रामदास धांडे यांच्या निवडीने इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी यांच्यात उत्साह व आनंदाचं वातावरण आहे. इगतपुरी तालुक्यात धांडे यांचा दांडगा जनसंपर्क असुन तालुक्यात कॉंग्रेसमय वातावरण निर्माण झाले आहे.
रामदास धांडे यांच्या निवडीचे स्वागत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जर्नादन माळी, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पंढरी बऱ्हे, संतु पाटील खातळे, भास्कर गुंजाळ, कचरु शिंदे, सुदाम भोर, कमलाकर नाठे, निवृत्ती कातोरे, बाळासाहेब कुकडे, उत्तम भोसले, , गोटीराम गुळवे, अरुण गायकर, मनिषा मालुजंकर, संध्या रोकडे, सुरेश पाटील धांडे, दिनेश धोंगडे, रामकृष्ण धोंगडे, विलास धांडे, संपतराव मुसळे, सचिन मते, ज्ञानेश्वर कडु, दौलतराव दुभाषे, बाळासाहेब वालझाडे, किरण पागेरे, सविता पंडीत, संतोष सोनवणे, रामदास मांलूजकर, रावसाहेब मालुंजकर, पुंडलिक धांडे, ईश्वर सहाणे, गणपत सहाणे, दिलीप पाटील, ॲड. जी. पी. चव्हाण, बाळासाहेब लगंडे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.