इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार प्रा. तुकाराम रोकडे यांना नाशिकच्या मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वृत्तांकन करणाऱ्या अठरा पत्रकारांना आणि पंधरा वृत्तवाहिनी पत्रकारांना पत्रकार भूषण […]
इगतपुरीनामा न्यूज – शिवसेनेच्या इगतपुरी उपतालुकाप्रमुखपदी वाघेरे येथील कट्टर शिवसैनिक बाळासाहेब धांडे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख विजयअप्पा करंजकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब धांडे यांची निवड केल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख […]
इगतपुरीनामा न्यूज – सतत दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातील सुनावण्यांना हजर न राहणाऱ्या फरार संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. घोटी पोलीस ठाण्यामधील दबंग म्हणून ओळखणारे पोलीस हवालदार सागर सौदागर यांनी त्याला कल्याणमधून मोठ्या शिताफीने अटक केले आहे. हरेश्वर हरी उर्फ आकाश सदाशिव मोगरे वय वर्ष ३० रा. टिटवाळा पूर्व असे संशयित सराईत आरोपीचे […]
इगतपुरीनामा न्यूज – १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत सिन्नर येथे राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून श्री “अन्न निरंतर” मिलेट फेस्टिवल २०२५ सुरु आहे. ह्या फेस्टिवलमध्ये आज खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण त्यामध्ये मिलीगेंस, वसुंधरा ऑरगॅनिक परिवार, ए. बी. गृहोद्योग, रहेजा ग्रुप, सर्वज्ञ फूड्स, अश्विनी टांकसाळे हे ९ खरेदीदार […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांची निर्दोष ठरवण्यात आले आहे. डिसेंबर २०२० मध्ये इगतपुरी पोलीस ठाण्यात तत्कालीन सहकार अधिकारी अनिल रामसिंग पाटील यांनी पंढरीनाथ काळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३५३, ५०४ व ५०६ अन्वये फिर्याद दाखल केली होती. सविस्तर असे की […]
इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाला कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे आदी उपस्थित […]
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय.. जय भवानी… जय जिजाऊ.. हर हर महादेव आदी उत्स्फूर्त घोषणा..भगव्या रंगाच्या वेशभुषेतील जनसमुदाय.. भगव्या पताका आणि झेंडे हाती धरून शिवरायांचा घोष करणारी तरुणाई ह्या जल्लोषाच्या शिव जन्मोत्सवात सहभागी झाली. इगतपुरी, घोटी, टाकेद, धामणगाव, साकुरफाटा, गोंदे, वाडीवऱ्हे, नांदगाव सदो, माणिकखांब, वैतरणा आदी गावांसह इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात […]
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह भारतीय हत्यार कायदा कलमांप्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस ठाण्याच्या हद्धीतील गौळाणे येथे दोन समाजामध्ये भांडण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळी तात्काळ तपास पथक रवाना होऊन ह्या गुन्ह्यातील २ संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे हस्तगत […]
इगतपुरीनामा न्यूज – सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने ह्या महोत्सवात बचत गट उत्पादने, पौष्टिक तृणधान्य विक्री व प्रदर्शन होणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द व चौरेवाडी येथील बालभैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या प्रगतीपथावरील कामास जलसंधारण महामंडळ छ. संभाजी नगरचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांनी भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. कडवा धरणातुन पाणी उपलब्ध असलेल्या सिंचन योजनेच्या जॅकवेलचे काम व वितरण व्यवस्थेची त्तांनी पाहणी करून कामाबद्दल मार्गदर्शक […]