कसारा घाटात ट्रकच्या अपघातात १ जण जागीच ठार ; ३ गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा बायपास साईबाबा खिंडी जवळ ट्रक क्रमांक MH 18 BA 8566 च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रक पलटी होऊन २ जण ट्रकच्या खाली दाबले गेले. ही घटना आज पहाटे झाली. या भीषण अपघातात 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीपैकी एक जण ट्रकच्या खाली अडकलेला होता. त्याला आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, जस्विंदर सिंग, बाळू मंगे यांनी क्रेनच्या मदतीने 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप काढले. जागीच ठार झालेल्या अडकलेल्या ट्रकचालकास बाहेर काढले. कसारा पोलीस, 108 रुग्णवाहीका, 1033 रुग्णवाहीका, टोल पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस ट्राफिक मदतीला होते.

Leave a Reply

error: Content is protected !!