लोककलावंतांकडून लसीकरण व जनजागृती महाअभियान ; आनंदतरंग फाउंडेशनकडून जिल्हाभर कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे व क्षेत्रीय प्रचार कार्यालय नाशिक यांच्या मार्फत लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती महाअभियान सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील आनंदतरंग फाऊंडेशनचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जनजागृती महाअभियान राबवित आहे. १६ चित्ररथ, ८०० कलावंत, ११ हजार ४०० कार्यक्रम, १ हजार १४० दिवस कार्यक्रम चालणार आहे. 
जर आपण सुरक्षित तर देश सुरक्षित ! कोरोना  लस सुरक्षित  आहे ! लसीकरणाला साथ देवु या, देशाला आत्मनिर्भर बनवूया ! याबरोबरच SMS जनतेपर्यंत पोहोचवत आहे. S म्हणजे सुरक्षित अंतर  ठेवा! M म्हणजे मास्क लावा! S म्हणजे सॅनिटायझरचा वापर करा !. ही त्रिसूत्री समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी करत आहे. आतापर्यंत भारत सरकारच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीवर अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले असून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाच्या वतीने त्यांनी कार्यक्रम केले आहेत
सव्वा दोनशे गावांमध्ये आत्तापर्यंत कार्यक्रम झाले. असे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक रणांगणातील कोरोना योद्धा म्हणून आनंदतरंग लोककला संचाचे इगतपुरी तालुक्यातील शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी संदेश पोहचविण्याचे काम अविरतपणे करत आहे.
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे डॉ. पाणपाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी मलखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदतरंग कलापथकाच्या माध्यमातून शाहीर उत्तम गायकर, शंकरराव दाभाडे, शिवाजी गायकर, देविदास साळवे, प्रशांत भिसे,  पंढरीनाथ भिसे, दुर्गेश गायकर, नामदेव गणाचार्य, ओमकार गायकर हे कलावंत कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!