
इगतपुरीनामा न्यूज, दि. 8
इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती रामदास विठ्ठलराव घारे यांचे दि. 7 एप्रिलला अल्पशा आजाराने निधन झाले. शांत संयमी, अभ्यासू, विचारवंत आणि सुसंस्कारित विचारांचे रामदास घारे ओळखले जात. त्यांचे निधन झाल्याचे समजताच इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. इगतपुरीचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव घारे यांचे ते सुपुत्र होत.
इगतपुरीसह संपूर्ण जिल्हाभरात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि नागरिकांवर भक्कम पकड होती. त्यांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात विविध विकासकामे झालेली आहेत. भाम धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केलेले आहे. त्यांच्या निधनामुळे इगतपुरी तालुका हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मुकला असल्याचे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
Comments