जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन रेकॉर्ड ब्रेक होणार – जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे : धुळे जिल्ह्यात पिंपळनेर येथे ४ आणि ५ जूनला होणाऱ्या अधिवेशनासाठी राज्यातील महिला येणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

४ आणि ५ जूनला धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे स्मृतिशेष जयवंताताई दयाराम शिंदे नगरीत दमंडकेश्वर लॉन्सच्या स्मृतिशेष शोभाआक्का सुरेंद्र मराठे विचारमंचावर जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन होत आहे. ह्या कार्यक्रमाला अनेक वक्ते, लेखक यासह अनेक  राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदीयाळी उपस्थिती लाभणार आहे. अधिवेशनास सर्वच स्तरातुन प्रतिसाद मिळत असल्याने अधिवेशन गाजणार असल्याचे चित्र दिसत आहे. महिलांच्या उपस्थितीने अधिवेशन रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी ४ जूनला दुपारी ४ वाजता राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातुन संभाजी आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा निघेल. पिंपळनेर आणि परिसरासह राज्यभरातून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला भगव्या साड्या नेसून व डोक्यावर भगवा फेटा परिधान करत या शोभायात्रेत सहभागी होतील. शोभायात्रेत जिजाऊ रथ व पालखी, ग्रंथदिंडी यासह शिवकालीन शस्त्रकला यासह विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत. मुख्य बाजार पेठेतून मार्गस्थ होत अधिवेशन स्थळी दमंडकेश्वर लॉन्सवर शोभायात्रेचा समारोप होणार आहे. शोभायात्रेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा अहिरराव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी संरक्षणमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे व डॉ. बिना भामरे, कृषीमंत्री ना. दादा भुसे व अनिताताई भुसे, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व आश्विनी कुणाल पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मिनाक्षी कदमबांडे, जिल्हा परिषद कृषी सभापती संग्राम पाटील व स्नेहा संग्राम पाटील,बालकल्याण सभापती धरती देवरे, कविता हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, कालिका विद्या प्रसारक संस्थेचे विजय गजानन पाटील व सुवर्णा विजय पाटील, चंद्रकला दहिते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य सुधा गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

४ जूनला रात्री ८ वाजता होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी आयोजित केलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात महिला ऐतिहासिक कार्यक्रमांसह प्रबोधनात्मक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. लावणीच्या कार्यक्रमासह गोंधळ, भारूड, गवळण, नाटिका अशी समृद्ध लोककला सादर केली जाईल. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य सुधाताई गांगुर्डे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून  उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ बेडसे, धुळे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, विभागीय  शिक्षण प्रकल्प संचालक पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवारी ५ जूनला सकाळी ८ वाजता औरंगाबाद जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांचा प्रसिद्ध शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उदघाटन मनकर्णाबाई विनायक मराठे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. विजयकुमार घोगरे, स्वागताध्यक्ष मिरा बिरारीस, अधिवेशनाचे प्रास्तविक जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे करतील. शासन दरबारी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध ठराव पारित करण्यासाठी मांडतील. स्मरणिका प्रकाशन डॉ. बिनाताई सुभाष भामरे तर जिजाऊ ब्रिगेडची भूमिका प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर मांडतील. अधिवेशन संयोजनानूभव जिजाऊ ब्रिगेड साक्री तालुकाध्यक्ष व संयोजक भारती भदाणे मांडतील.यावेळी प्रमुख अतिथी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री व बारामती ॲग्रोचे ट्रस्टच्या सचिव सुनंदाताई पवार, संगमनेरच्या कार्यक्षम नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, भारतीताई राधाकृष्ण गमे, शिक्षण सभापती मंगलाताई पाटील, आरोग्य सभापती धरतीताई देवरे, ज्ञानज्योती भदाणे, सुप्रिया बेडसे, अनिता पराग बेडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

व्याख्यान सत्रात “ग्रामीण अर्थशास्त्र आज आणि उद्या”या विषयांतर्गत  बचतगटांसह उद्योजक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. या सत्राचे उदघाटन प्रदेश कार्याध्यक्ष सीमा बोके करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील व्यवसाय मार्गदर्शिका डॉ. विद्या पाटील ( धुळे ), डॉ. अंजली कदम नारायणे ( पुणे ), उद्योजक संजय वायाळ ( पुणे ), ताई बोराडे ( लातूर ) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा, अनिष्ट कालबाह्य रूढी परंपरा टाळण्यासाठी वर्तमान युगात महिलांनी कसे आचरण करावे यासंदर्भात “शिवधर्मातील महिलांचे स्थान”या विषयांतर्गत विविध तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे ( सोलापूर) राहतील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाची बुलंद तोफ व प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे, मयुराताई देशमुख ( अमरावती ), रेखा सूर्यवंशी, भारती मढवई ( अमरावती ) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिजाऊ ब्रिगेड तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना महिलांमध्ये राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, उद्योजिका सुनंदा पवार, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शरीरसौष्ठवपटू स्नेहा  कोकणे पाटील, राजमाता जिजाऊ चित्रपटाच्या निर्मात्या मंदा निमसे, लावणी सम्राज्ञी मंजू ठाकरे ( अमरावती ), योगा अभ्यासिका आकांक्षा अहिरराव, प्रसिद्ध लाठीकाठी पटू शांताबाई पवार, शालिनी भदाणे आदींसह ३५ महिलांना अधिवेशनात जिजाऊ रत्न, जिजाऊ गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. मराठा सेवा संघासाठी योगदान देणाऱ्या उषामाई पाटील व इंजि. एस. आर. पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

समारोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे आहेत. यावेळी व्याख्याते गंगाधर बनबरे, प्रति इतिहासकार इंजि. चंद्रशेखर शिखरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे, नाशिक
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शन होणार आहे. विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे, खासदार उन्मेश पाटील, अमळनेरचे माजी आमदार अनिल, उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, संदीप माळोदे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष संदीप पाटील विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, अधिवेशन मार्गदर्शक सुरेंद्र मराठे, प्राचार्य ए. बी. मराठे, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता इंजि. पद्माकर भोसले, कार्यकारी अभियंता इंजि. राहुल पाटील, इंजि. सिद्धार्थ तांबे, तहसीलदार पंकज पाटील,.नगररचना आयुक्त रविंद्र जाधव, उपाध्यक्ष इंजि. अरविंद गावंडे, इंजि. के.डी.पाटील, इंजि. राजेश मोरे, अशोक महाले, प्रा. रामकिसन पवार, खजिनदार अशोक पटोकार, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महिलांसाठी नारंगी भगवा रंग तर दुसऱ्या दिवशी रविवारी महिलांसाठी राणी किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस कोड आहे. पुरुषांसाठी दोन्ही दिवस भगवा कुर्ता व पांढरा पायजमा असा ड्रेस कोड करण्यात आला आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या उपक्रमशील प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी राज्यव्यापी ग्रामीण अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी साक्री तालुकाध्यक्ष भारती भदाणे यांनी अधिवेशन घेण्यास राज्यभरातुन पहिला होकार दिला. भारती भदाणे या पायाने अपंग असून महिन्याभरात अतिशय चांगले नियोजन करत सर्वांना सामावून घेत अधिवेशन संयोजन करत आहेत. अधिवेशन यशस्वीतेसाठी त्यांची धावपळ पाहून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यासाठी जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी मदत करत आहेत. ह्या रेकॉर्डब्रेक अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्यासह मराठा सेवा संघ धुळे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, साक्री तालुकाध्यक्ष बी. एम. भामरे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुलभा कुंवर, जिल्हाध्यक्ष नूतन पाटील, विभागीय अध्यक्ष डॉ. उषा साळुंखे, तालुकाध्यक्ष भारती भदाणे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!