अपघातपुरी की इगतपुरी ? : गोंदे फाट्यावर अपघातात २ बालके आणि पतिपत्नी गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे मिळाला वेळेत उपचार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे लवकरच अपघातांचे मोठे केंद्र बनणार आहे. गोंदे दुमाला हा फाटा तर अपघातांचे हॉटस्पॉट बनला आहे. आज दुपारी १ वाजता इतर भरधाव वाहनांमुळे मोटारसायकलवरील वेगावर नियंत्रण न झाल्याने गतिरोधकावर अपघात झाला. मोटारसायकलवरून सर्वजण पडल्याने या अपघातामध्ये २ बालके आणि पतिपत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ह्या मदतीमुळे सर्वांना वेळेत उपचार मिळाले. MH 15 FE 6867 ह्या मोटारसायकलला घोटीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे गतिरोधकांवर अपघात झाला. यामध्ये संतोष अशोक निकम वय 45, ज्योती संतोष निकम वय 31, क्रीमी संतोष निकम वय ३, आयुष संतोष निकम वय ६ सर्व राहणार पाथर्डी फाटा नाशिक हे सर्व जोरात पडल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

इगतपुरी तालुक्यातील अपघातांची मालिका थांबणार आहे का नाही ? : सर्वपक्षीय नेत्यांकडून संबंधितांना वठणीवर आणण्याची गरज संबंधित बातमी खालील लिंकवर क्लिक करून वाचा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!