त्र्यंबकला शिवप्रसाद हॉलमध्ये कोविड सेंटर उभारणार ; खासदार गोडसेंकडून अंजनेरीच्या कोविड सेंटरची पाहणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

अंजनेरी येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला खासदार हेमंत गोडसे यांनी आज भेट दिली. या सेंटरचे काम व्यवस्थित चालु असल्याबद्दल गोडसे यांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी उत्तम वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध असुन कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने या कोविड सेंटरमध्ये दाखल होवून वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन गोडसे यांनी केले.

त्र्यंबकेश्वर अंजनेरी येथे असलेल्या कोविड सेंटर मध्ये बेड शिल्लक नसल्याने त्र्यंबकेश्वर शहरात श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या शिवप्रसाद हाॅल मध्ये कोविड सेंटर उभारणीच्या सुचना खासदार गोडसे यांनी तहसीलदार दिपक गिरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा बर्वे, वैद्यकीय अधिकारी सोनवणे मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांना केल्या. यावेळी नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे, विश्वस्त भुषण अडसरे, संतोष कदम, नगरसेवक श्याम गंगापुत्र, नितीन पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे मॅडम यांनी कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. तर, कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना खासदार गोडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

कोविड – १९ अंतर्गत केलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल खासदार यांनी कौतुक केले. महापालिका “माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम चांगल्या पध्दतीने राबवत आहे. सर्व्हेक्षणातुन प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्षमतेने उपाययोजना राबवणे शक्य होणार आहे. भविष्यातील कोरोनाच्या आजाराचा प्रसार विचारात घेता त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन वेळेत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.