इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत इगतपुरी तालुक्यात 51 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज अवघ्या 29 नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर पर्यंत 250 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्ण रोगमुक्त होण्याचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी सूचनांचे पालन केल्यास कोरोना निर्मूलन करणे सोपे जाणार आहे.
तालुक्याच्या विविध भागात कोरोना लसीकरण सुद्धा वेगाने सुरू असून नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. ग्रामीण भागात संचारबंदीचे पालन करण्याकडे जनतेचा कल असून शहरी भाग आणि महामार्गालगतच्या गावांमध्ये मात्र नागरिक गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7038394724