इगतपुरी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जास्त संख्या असणारी अतिसंसर्गित गावे कोणती ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी शहर, घोटी बुद्रुक, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, मोडाळे, सांजेगाव, वैतरणा, टाकेद बुद्रुक, कांचनगाव, साकुर, पिंपळगाव डुकरा ही गावे अतिसंसर्गित गटात मोडतात. ह्या गावांमध्ये विनाकारण ये जा करणे आणि गर्दी करणे अत्यंत धोक्याचे समजले जात आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी काही महत्वाचे काम नसेल तर ह्या गावांमध्ये जाणे धोकादायक आहे. आरोग्य प्रशासन आणि यंत्रणा ह्या गावांमध्ये दक्षतेने काम करीत असल्या तरी नागरिकांनी पण विशेषत्वाने सावधानता बाळगणे अतिशय आवश्यक आहे.

कोरोनाचा अतिसंसर्ग झालेल्या गावांची माहिती द्या अशी मागणी अनेक वाचकांनी “इगतपुरीनामा” कडे केली होती. जनमानसात अतिसंसर्गित गावे माहीत झाली तर येथे जाणाऱ्या लोकांकडून निश्चितच अतिकाळजी घेतली जाईल असे वाचकांनी सुचवले होते. म्हणून अतिसंसर्गित गावे आपल्या माहितीसाठी दिली आहेत. लग्न, दशक्रिया विधी, लग्नाची जमवाजमव, वाढदिवस आदी कारणांसाठी ह्या गावांमध्ये जाणे टाळायला हवे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्याच्या काळात कारण नसताना फिरणे अतिशय धोकादायक आहे.

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी

कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!