इगतपुरी शहरात घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 4 ( शैलेश पुरोहित )
फेब्रुवारी महिन्यात 14 व 15 तारखेला इगतपुरी शहरातील रहिवासी हरी गुलाब वीर, रा. सहा बंगला, आठ चाळ, इगतपुरी हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.  त्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक सॅमसंग एलईडी टिव्ही, 2 गॅस सिलेंडर, 01 पाण्याची मोटर असा एकूण 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. ह्या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. 28/2021 भादवि 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरून इगतपुरी शहरातील संशयीत नामे 1 ) राहुल बाळासाहेब घेगडमल वय- 36 , रा. क्रांतीवीर जोतिबा फुलेनगर, आठचाळ, इगतपुरी, 2 ) रोहीत अशोक बागुल वय- 21 रा. क्रांतीवीर जोतिबा फुलेनगर, आठचाळ, इगतपुरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी फेब्रुवारी महिन्यात इगतपुरी शहरातील आठचाळ परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींचे कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला 01 सॅमसंग LED टिव्ही, 02 गॅस सिलेंडर, 01 पाण्याची मोटर, 01 ऑर्गन असा 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी इगतपुरी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षकराजेंद्र कुटे, सपोउनि नवनाथ गुरुळे, पोहवा शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोना संदीप हांडगे, जालिंदर खराटे, पोकॉ सचिन पिंगळ यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!