विनंती करतो मायबाप तुम्हा, सुखरूप रहा घरात


कोविड नाईंटीन कोरोना व्हायरस, प्रसार झालाय जगात
विनंती करतो मायबाप तुम्हा, सुखरूप राहा घरात ।।धृ ।।
जीवसृष्टीचा ऱ्हास करण्या, आलाय होऊन कर्दनकाळ
मानवांच्या लयास त्यांनी, केली बघा ही सुरुवात ।।१ ॥
संयम सुटला माणूस चळला, या विश्वाचा तोल बिघडला
मानव जातीच्या ऱ्हासाची, झाली बघा ही सुरुवात।।२ ।।
जीवनाच्या संघर्षात ह्या, मानव हरला भूक तहान
स्वार्थासाठी त्यांनी केला, सृष्टीचा हा नयनाट।।३ ।।
निर्जीव असा हा कोरोना व्हायरस, नाही दिसत या दृष्टीस
लागन होता डंका त्याचा, करतो जीवास हैरान ।।४ ।।
काळ आला बिकट मोठा, केलाय त्याने कहर हो
कोठून कसा येईल तो आता, काहीच कळणार नाही हो ।।७ ।।
स्व अस्तित्वाची लढाई आता, स्वतःच घ्या पुढाकार
एकमेकांना भेटण्यापेक्षा, करा दुरूनच नमस्कार ।।६ ।।
नियम केले कायदे केले, करु नका अवमान
आपल्यासाठीच सरकार माझे करतोय आव्हान ।।७ ।।
जागृत असे सरकार माझे, झटतोया बघा दिनरात
साथ देऊन करुया आपण, कोरोनाचा नयनाट।।८ ।।
श्री बाप्पा गतीर, रिसोर्स टीचर मुंढेगावकर ता. इगतपुरी जि. नाशिक मोबा. 8805795532

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!