तळेगाव शिवारातील हॉटेल गारवामध्ये हॉटेल कर्मचारी युवकाची आत्महत्या

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात महामार्गालगत असलेल्या हॉटेल गारवा येथील कर्मचारी दादु भोरू भले, वय २२ वर्ष, रा. बोर्ली, जांबवाडी, ता. इगतपुरी या युवकाने हॉटेल रूम नं. १०५ या खोलीत पंख्याच्या हुकाला दोर बांधुन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०-३० वाजेच्या दरम्यान घडली. याची माहिती हॉटेल चालक विलास त्र्यंबक खातळे रा. जुना गावठा, इगतपुरी यांनी पोलीस ठाण्यात दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकांनी घटनास्थळी पंचनामा केला असता रूम नं. १०५ मध्ये पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या युवकाला खाली काढुन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी युवकाला मृत घोषीत केले. या घटनेचा तपास केला असता युवकाने गळफास का घेतला या बाबत अद्याप कोणतीही माहिती पोलीस तपासात आढळुन आली नाही. या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फकीरा थोरात व पोलीस पथक करीत आहे. असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.