इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध : तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि.

इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार महागाई मुक्त भारत आंदोलन राज्यभर राबवले जात आहे. इगतपुरी काँग्रेसतर्फे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध करून इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, गॅससह सर्व वस्तुंचे दर प्रचंड वाढवुन जनतेची लूट करीत आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल व खाद्य तेलाच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असून जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. यामुळे केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत या सरकारला आता घरी बसवावं लागेल त्याशिवाय जनता सुखी होणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली. माजी सभापती गोपाळ लहांगे, संपत मुसळे, बाळासाहेब कुकडे, जेष्ठ नेते देवराम मराडे, ॲड. जी. पी. चव्हाण, माजी सरपंच जयराम धांडे, गटप्रमुख आकाश दिवटे, तालुका उपाध्यक्ष लकी गोवर्धने, अमोल गोवर्धने, सतार मणियार, उत्तम शिंदे, भास्कर कातोरे, लक्ष्मण गोवर्धने, उत्तम गोवर्धने, भास्कर गोवर्धने, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, प्रतीक गोवर्धने, दीपक मुसळे, गजीराम भोर आदींसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!