कसारा घाटात इको वाहनाला अपघात : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांकडून अपघातग्रस्तांना मिळाला दिलासा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

मुंबई आग्रा महामार्गांवर कसारा घाट उतरत असतांना एका इको कारला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने आज अपघात झाला. ह्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नानिज धाम यांच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमीला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यावेळी त्या रस्त्याने मुंबईकडे जात होते. त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. विचारपूस करून त्यांनी संबंधितांना दिलासा दिला.

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटातील शिवनेरी ढाब्याजवळ MH 48 BH 1758 ही इको कार घाट उतरत असताना अचानक मागून भरधाव ट्रक टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. यात कार मधील सुखदेव गरुड रा. येवला  हे गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस घोटी केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम, टोल पेट्रोलिंग टीमचे राहुल पुरोहित, विजय कुंडगर, अनिल ठाकुर घंटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान ना. छगन भुजबळ यांचा ताफा घाटातून जात होता. त्यादरम्यान भुजबळानी आपला ताफा थांबवून जखमींची विचारपूस केली. ह्या अपघातामुळे नवीन कसारा घाटाच्या उतारावर विस्कळीत झालेली वाहतूक महामार्ग पोलिसांनी सुरळीत केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!