गोंदे दुमाला गावात 2 दिवस जनता कर्फ्यु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2
जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या गोंदे दुमाला गावात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. ह्या पार्श्वभूमीवर गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने 3 आणि 4 एप्रिल ह्या दिवसांसाठी जनता कर्फ्यु घोषित केला आहे.
कोरोना महामारीचा जास्त प्रसार होवु नये यासाठी शनिवार 3 एप्रिल ते  रविवार 4 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु असणार आहे. ह्या दोन दिवसात गावात फक्त दवाखाने व मेडीकल सोडून इतर सर्व दुकाने पुर्ण पणे बंद राहणार आहेत. भाजीपाला, दुध, किराणा, मासे, मटण, बोंबील, बिअर बार आदी सर्व दुकाने बंद राहतील. ह्या 2 दिवसात कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये अन्यथा दंडात्मक व कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रसिद्धी पत्रकावर पोलिस स्टेशन वाडीव-हे, ग्राम पंचायत गोंदे दुमाला, आरोग्य उपकेंद्र गोंदे दुमाला, तलाठी कार्याल्य गोंदे दुमाला यांचा जनता कर्फ्युत संयुक्त काम केले जाणार असल्याचा उल्लेख आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!