इगतपुरीनामा न्यूज, दि. 2
इगतपुरी मतदारसंघाला कायापालट करण्याचा ध्यास उराशी बाळगत अहोरात्र काम करत असणारा आमदार लाभला आहे. जनतेने योग्य व्यक्तीची निवड केली असून ह्या विश्वासास ते पात्र ठरत असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी घोटी खुर्द येथे केले
आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून मूलभूत सोयी विकास अंतर्गत 10 लक्ष रुपयांच्या सभामंडपाचे घोटी खुर्द येथील कोकणेवाडी मध्ये भूमिपूजन गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले होते. विकास साधण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आ. खोसकर यांना साथ द्यावी असे भोसले म्हणाले.
कार्यक्रमप्रसंगी युवक काँग्रेसचे भास्कर खोसकर, छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रतन मेढे, युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस उत्तम बिन्नर, संघटक अर्जुन गुंजाळ, युवा नेते आत्माराम फोकणे, सरपंच ताई बिन्नर, उपसरपंच कैलास फोकणे, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग रोंगटे, बाळू जाधव, निकिता लोहरे, माजी सरपंच बाळासाहेब फोकणे, पांडुरंग काठे, उद्धव रोंगटे, निवृत्ती लोहरे, कचरू जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210401-WA0050.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210401-WA0050.jpg)