इगतपुरी तालुक्यात आज वाढले “इतके” कोरोना पॉझिटिव्ह..!

Advt

इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी घोटी शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून आज 43 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज रोजी तालुक्यातील उपचार घेणाऱ्या सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या 369 झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील दोन्ही शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने उच्छाद मांडला असून कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने नागरिकांसह प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. तर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घोटी ग्रामपालिकेने 2 ते 4 एप्रिलपर्यंत 3 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे.
आज 43 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण उपचार घेणाऱ्या सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 369 झाली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असतांना नागरिकांनी सतर्क राहून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना योग्य ती काळजी घेत प्रशासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे.

ह्या आठवड्यात 50 नवे बेड उपलब्ध होतील

■ इगतपुरी तालुक्यासाठी प्राथमिक स्तरावरील CCC चे 50 बेड कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत. या ठिकाणी सध्या 18 रुग्ण आहेत. दुसरे CCC चे 200 बेड एकलव्य आश्रम शाळा पिंप्री सदो येथे मंजूर असून त्या ठिकाणी सध्या 25 रुग्ण आहेत. असे CCC चे एकूण 250 बेड सध्या मंजूर आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यासाठी द्वितीय स्तरावरील DCHC ग्रामीण रुग्णालय सेंटर इगतपुरी येथे कार्यरत आहे. या ठिकाणी ऑक्सिजनचे 20 व इतर 10 असे 30 बेड कार्यरत आहेत. यातील दहा बेड देखील ऑक्सिजन सुविधेसह अद्ययावत केले जात आहेत. यासोबतच ग्रामीण रुग्णालयात 20 नवीन बेड ऑक्सीजन लाईनसह तयार करण्याचे प्रस्तावित आहे. म्हणजेच या आठवड्यात ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे एकूण 50 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होतील.
तेजस चव्हाण, प्रांताधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभाग

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!