इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 :
इगतपुरी तालुक्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी आठवडाभरापासून १० वरच स्थिरावली आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवाला नुसार आज तालुक्यात फक्त २ रुग्णांची भर पडली असून २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या एकूण १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान तालुक्यात लसीकरणानेही वेग पकडला असून तालुक्याने आज लसीकरणात महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आज अखेर ५० हजार कोरोना डोस पूर्ण झाल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार सर्वांनाच तातडीने लस मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. लवकरच इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याची अपेक्षा तालुकावासीय बाळगून आहेत.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008