इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
इगतपुरी तालुक्यात आज कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज तब्बल 81 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांचे निदान झाले आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊन असताना ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. तशीच वाढ सध्या मार्चमध्ये होत असल्याने तालुका प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. यात मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये तर रोज नवीन उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून कोरोना संक्रमण फैलावत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात सर्वांनाच कडक निर्बंधांना सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आज अखेर 400 पेक्षा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
● कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.