
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना आज दुपारी 2.45 च्या सुमारास मारुती ओमिनी क्रमांक MH 14 BK 9272 च्या चालकाचा रायगडनगर जवळ वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ओमीनी पलटी झाली. या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ओमीनीचालक प्रविण चंद्रकांत गांगुर्डे वय 40 रा. नाशिक आणि प्रवासी दौलत दामू देहाडे वय 41 रा. आळवंड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.