घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊ यांना अभिवादन : सिंधूताई सपकाळ यांना वाहिली श्रद्धांजली

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक ऐतिहासिक वारसा जपत जुन्या पद्धतीने गडकिल्ल्यावर प्रत्येक सण, कार्यक्रम राबविण्याचे कार्य करीत असतात. यावेळी मंडळाने घोटीच्या न्हायडी डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात राजमाता जिजाऊंची ४२४ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावेळी प्रियंका मराडे हिने राजमाता जिजाऊ यांचा पेहेराव परिधान केला होता. जिजाऊंची जल्लोषात घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने राजमाता जिजाऊंच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी अनाथांची माय कै. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शाहीर बाळासाहेब भगत यांनी राजमाता जिजाऊंवर पोवाडा गायन करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, सुरेश चव्हाण, महिंद्र आडोळे, काळू भोर, उमेश दिवाकर, नितीन भागवत, निलेश पवार, भगवान तोकडे,  लक्ष्मण जोशी, सोमनाथ भगत, ज्ञानेश्वर मांडे,  संतोष म्हसणे, निलेश बोराडे, गणेश काळे, जनार्दन दुभाषे, एकनाथ माळी, गोकुळ चव्हाण, शिवदास जोशी, प्रियंका मराडे, नगमा खलिफा आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.

हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी न्हायडी डोंगरावर अभिवादन केले. यावेळी अनाथांची माय कै. सिंधुताई सपकाळ यांचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसुबाई मित्रमंडळ

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!