इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतावलेल्या इगतपुरी तालुक्याला आज चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी विविध भागात नियमांची कठोर अंमलबजावणी आणि ठराविक दिवसांचे लॉकडाऊन उपयुक्त ठरते आहे.
कोरोनाने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एकही रुग्ण सापडला नसला म्हणून अनिर्बंध वागू नये असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
■ लहान मुले, वृद्ध, आजारी रुग्णांना अधिक धोका असल्याने अधिकाधिक काळजी घ्यावी. तरुणांनी व कामगारांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि औषध व्यवस्थापन करावे. बर्फानी आरोग्य प्लस ह्या उपयुक्त औषधींचा नियमित वापर केल्यास रुग्णांना आणि इतरांना सुद्धा फायदा झाल्याचे दिसून आलेले आहे.
– डॉ. मंगला लढ्ढा, बर्फानी फार्मा आणि आयुर्वेदाचार्य नाशिक