
इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण रोज वाढू लागले आहेत. नागरिकांकडून नियमांना बेलगामपणे हरताळ फासला जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. आज एकाच दिवशी तब्बल 33 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 303 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. इगतपुरी तालुक्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आगामी काळ अत्यंत खडतर असणार आहे.
आरोग्य आणि स्थानिक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.