इगतपुरी तालुक्यातील महिला उपसरपंचाला अतिक्रमण भोवले ; पदावरून पायउतार केल्याचा आदेश पारित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यातील आडवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती संदीप शेलार यांनी शासकीय जागेत केलेले अतिक्रमण हे बेकायदेशीर आहे. या कारणावरून ज्योती शेलार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी हा निकाल दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील उपसरपंच यांनी गावठाणातील गट नंबर 794 मध्ये अनधिकृतपणे अतिक्रमण केले होते. त्यामुळे उपसरपंच ज्योती संदीप शेलार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत गावातील शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याने या विरोधात गावातीलच गोटीराम लक्ष्मण शेलार यांनी हरकत घेऊन प्रशासनाकडे तक्रार केली होती. दरम्यान याबाबतची तक्रार अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडेही केली होती. या तक्रारी अर्जावर सुनावणी होऊन तक्रारदाराने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यात आले. यानुसार नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ( ज-3 ) अन्वये विवाद अर्ज मान्य करून आडवणच्या उपसरपंच ज्योती शेलार यांचे उपसरपंच पद व सदस्यपद अपात्र करण्यात आले असून त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी हे पद अपात्र ठरविले आहे. तक्रारदार गोटीराम शेलार यांच्या वतीने यांच्यावतीने अँड. राजेश बेजेकर यांनी काम पाहिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!