लॉकडाऊनची वर्षपुर्ती : कोविड काळातील जनसेवेचा “किरण”

किरण फलटणकर, अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी

२३ मार्च २०२० रोजी भारतात लाॅकडाऊन लागल्यानंतर लाखो परप्रांतीय बांधव पायी आपल्या राज्यात जाण्यासाठी आपला संसार घेऊन निघाले. अशा हजारो बांधवांना उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या श्री घाटनदेवी मंदिर इगतपुरी येथे आमच्या जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीच्या माध्यमातून
■ भोजनाचे पॅकेट, पाणी बाॅटल, बिस्कीट पुडे देण्यात आली. इगतपुरी शहर व तालुक्यातील हजारो गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. इगतपुरी शहर परिसरात अन्नछत्राच्या माध्यमातून सलग ८१ दिवस निराधार व गरजु बांधवांना जेवण देण्याचे काम केले.
■ अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप, मास्क, फेसशिल्ड, हँड ग्लोज वाटप केले.
■ माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमध्ये सक्रिय सहभाग
■ इगतपुरी शहर सॅनिटाईझ केले.
■ आयुष काढा बाॅटलचे मोफत वाटप केले.
■ रक्तदान शिबीर दोन वेळा घेण्यात आले.
■ कोवीड काळात मुंबई आग्रा महामार्गावर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निराधार तरुणांचे अंत्यसंस्कार केले.
■ कोविड काळात दिवाळीमध्ये इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त फराळ, साडी, कपडे वाटप केले.
■ ब्लॅंकेट वाटप – इगतपुरी त्र्यंबकेश्वर, देवबांध, खोडाळा तालुक्यातील आदिवासी बांधवांना वाटप केले.
■ वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात आली.
■ ऑक्सिजन सिलेंडर व ऑक्सिजन मशीन गरजु रुग्णांसाठी आणण्यात आली.
■ इगतपुरी रेल्वे स्टेशन व बस स्टँड येथे सुध्दा परप्रांतीय हजारो प्रवासी बांधवांना जेवणाची पाॅकिट,।फळे, पाणी बाॅटल बिस्कीट दिली.
इत्यादी सेवा कार्य जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन अनेक देणगीदार, शासकीय अधिकारी व जनसेवेच्या सहकारी यांच्या माध्यमातून करण्यात आल्या.

– किरण फलटणकर, अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी

किरण फलटणकर, अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी