इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल गटात असलेल्या सोमनाथ नगर येथे विनायक माळेकर यांच्या अथक प्रयत्नाने नवीन अंगणवाडी क्रमांक 1 व 2 इमारतीचे भुमिपुजन काँग्रेसचे युवा नेते विनायक माळेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी सोमनाथ नगर ते बेंडकोळी वस्तीचे उदघाटन सुध्दा करण्यात आले. या विविध कामांचे भुमिपुजन झाल्याने अनेक महिन्यांपासून असलेले प्रलंबित प्रश्न आज खऱ्या अर्थाने सुटल्याने जनतेचे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीच्या दोन नवीन इमारती उभ्या राहणार असून बालकांना हक्काची असी जागा मिळणार आहे. त्यामुळे बाल गोपाळांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पण आंनद दिसत होता. तसेच यानंतर सुध्दा अनेक जन उपयोगी विकासकामे करणार असल्याचे विनायक माळेकर यांनी सांगितले. यावेळी युवा नेते मिथुन राऊत, मोहन बेंडकोळी, वामन खरपडे, सरपंच भगवान बेंडकोळी, उपसरपंच तुळशीराम बेंडकोळी, संजय बेंडकोळी, सरपंच विष्णु बेंडकोळी, सरपंच धनंजय बेंडकोळी, बाळासाहेब गोरे, देवचंद बेंडकोळी, प्रकाश जाधव, गुलाब बेंडकोळी, देवराम बेंडकोळी, भगवान बेंडकोळी, विठ्ठल पवार सुकदेव बेंडकोळी आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.