
इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे मुंबईच्या नायरा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी सामाजिक बांधीलकीमधून दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप केले. नायरा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये शाळेतील विद्यार्थ्याना दत्तक घेतले आहे. आदिवासी दुर्गम भागात त्यांचे काम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मनोगत माजी सैनिक विजय कातोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विरनारी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा रेखा खैरनार, शैला पाचरणे, सविता योगेश लांडगे, तेजस्विनी पवार, शुभांगी खैरनार, वीरमाता कृष्णाबाई बोडके, स्वराज्य उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, व्यापारी आघाडीचे नारायण जाधव, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, उपतालुकाध्यक्ष सखाराम गव्हाणे, प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, प्रहारसेवक सपन परदेशी, निलेश मोहिते, सुनील पगारे, अंबादास धांडे, दीपक उगले, स्वराज्य आरोग्य आघाडी उपतालुकाप्रमुख पप्पू शेलार, नांदगाव गटप्रमुख कैलास गव्हाणे, माजी सैनिक किसन हंबीर, हरीश चौबे, दीपक उगले, दीक्षा बोराडे, अंबादास धांडे, रमेश उदावंत आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.