इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळणे आमच्यासाठी भूषणावह – आमदार हिरामण खोसकर

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

पक्षीय पातळीवर काम करताना पक्षाच्या सूचनेनुसार विविध आंदोलने, पक्षाची धोरणे राबविताना पक्षाचे संघटन करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाच्या कामात झोकून घेणारे ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, युवा पदाधिकारी भास्कर गुंजाळ यांच्या कामाची पावती म्हणून प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर प्रांतिक स्तरावर काम करण्याची संधी व जबाबदारी दिली. ही मतदारसंघासाठी भूषणावह बाब आहे असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.

इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन माळी यांची प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी (ओबीसी आघाडी),  प्रदेश चिटणीसपदी भास्कर गुंजाळ यांची निवड झाल्याने तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते संपतराव सकाळे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी म्हणाले की गाव ते प्रदेश पातळीपर्यंत आजपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. यामागे नेत्यांची साथ व पाठबळ देणाऱ्यांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेली जबाबदारी ही संधी मानून आगामी निवडणुकात काँग्रेसचा झेंडा कायम फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती राजाराम धोंगडे, गोपाळ लहांगे, बाळासाहेब लंगडे, पांडुरंग शिंदे, बाजार समितीचे संचालक सुनील जाधव, पुंडलिक धांडे, उत्तमराव भोसले, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, ईश्वर सहाणे, पंढरीनाथ बऱ्हे, लकी जाधव, बाळासाहेब वालझाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब कुकडे, माजी जिल्हा परिषद सदस्या बेबीताई माळी, ॲड. जी. पी. चव्हाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज माळी, ॲड. मारुती आघाण, उत्तम भोसले, कमलाकर नाठे, दौलत दुभाषे, अरुण गायकर, पुंडलिक धांडे, कैलास घारे, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, गणेश कवटे, विजय म्हसणे, उत्तम लहाने आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!