इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना महामारी पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात तातडीने कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी इगतपुरी तालुक्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना आज मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून इगतपुरी तालुक्यात पण त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. त्यामुळे बंद केलेले कोविड सेंटर अतितातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरच कोविड सेंटर चालू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, उपाध्यक्ष संजय सहाणे, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, माजी सरपंच रामदास आडोळे, माजी सरपंच कैलास भगत, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, गणेश मुसळे, विनोद चव्हाण, विशाल पावसे, रावसाहेब सहाणे, सखाहारी जाधव आदींसह राजसैनिक उपस्थित होते.
Similar Posts
Leave a Reply
You must be logged in to post a comment.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group