इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी तालुक्यात सलग काही दिवसांपासून काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असतांना आज चांगली बातमी आली आहे. आज दिवसभरात एकही कोरोना बाधितांचे निदान झाले नाही. सध्या तालुक्यात फक्त 132 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’ ला दिली.
आज दिवसभरात एकही नवीन रुग्णांचे निदान झाले नाही. सध्या तालुक्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 132 इतकी झाली आहे. आज एकही नोंद झाली नसली तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. इगतपुरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने नागरिकांना शासनाचे आदेश तंतोतंत पाळण्याचे आवाहन केले आहे.

Comments