दशक्रिया विधीत गर्दी केल्याने इगतपुरी पोलिसांनी केला दोघांवर गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
कोरोना महामारी संसर्गाचा वाढता धोका पाहता शासनाने साथीचा रोग नियंत्रणात येण्यासारही नियमावली ठरवुन दिली आहे. तरीही नियमांचे उल्लघंन करण्याचा प्रकार इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी येथे घडला. त्यामुळे इगतपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
टाकेघोटी येथे स्मशानभुमी जवळ नदीकाठी दशक्रिया विधीला 300 ते 400 लोकांनी गर्दी करून विधी सुरू होता. यावेळी कोरोना संसर्गाच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने पोलीस हवालदार राजेंद्र चिंतामण चौधरी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. दोघा लोकांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

मंगल कार्यालये, लॉन्स व गर्दीचे ठिकाणावर गर्दी न करण्याचे निर्देश आहेत. मात्र काही लोक जाणीवपुर्वक मोठे कार्यक्रम घडवुन समाजात साथीचे रोग पसरवित आहेत. अशा लोकांवर नियम उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
दिपक पाटील, पोलीस निरीक्षक इगतपुरी

टाकेघोटी येथे दशक्रिया विधीत गर्दी करून शासन नियमाचे उल्लघंन करतांना नागरीक