तुकाराम वारघडे यांच्या प्रयत्नांनी गंभीर रुग्णाचा वाचला जीव : एसएमबीटी रुग्णालयातील शस्त्रक्रिया झाली यशस्वी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

पंचवटी ( नाशिक ) येथील कारभारी राजाराम झुरडे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेला होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ही शस्त्रक्रीया परवडण्यासारखी नव्हती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते तथा घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने या रुग्णाची भेट घेवून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या रुग्णाच्या बाबतीत एसएमबीटी रुग्णालयाचे डॉ. सूरज कडलग यांच्याशी चर्चा करून झुरडे यांना तातडीने एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र झुरडे यांच्याकडे उपलब्ध कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांना आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करणे शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात येताच पुन्हा तुकाराम वारघडे यांनी सर्व कागदपत्रांसाठी पाठपुरावा करत स्वतः कागदपत्र मिळवून दिले. त्यामुळे झुरडे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे त्यांचा जीवही वाचला.

तुकाराम वारघडे यांच्यासह संदीप भोसले, भूषण डामसे, अविनाश भोईर, रवी धोंगडे, सागर निसरड, सागर घोटे आदींनी सदर रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी स्वतः पुढाकार घेवून कागदपत्र उपलब्ध करून दिल्याने सदरची शस्त्रक्रिया तातडीने करणे शक्य झाले आणि त्यामुळेच त्यांचा जीव सुध्दा वाचल्याने या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

"डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केलेली होती, मात्र कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने विलंब होत होता. तुकाराम वारघडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी सुकर झाल्या. गंभीर स्वरूपाची शत्रक्रिया यशस्वी होवून मी तुमच्याशी बोलतो आहे याचे श्रेय डॉक्टरांबरोबरच वारघडे यांचेही असून मी त्यांचा आभारी आहे." 
- कारभारी झुरडे, पंचवटी, नाशिक
"आरोग्य विभागाच्या माध्यमातून असंख्य योजना सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा सामान्य माणसाला याची माहिती नसल्याने अडचणी येतात. मी फक्त त्यांना आरोग्य योजनेची माहिती दिली आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मदत केली. माझ्या छोट्याश्या मदतीमुळे त्यांच्यावर वेळीच उपचार होवू शकले याचा आनंद आहे." 

- तुकाराम वारघडे, सामाजिक कार्यकर्ते, इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!